Ganesh Visarjan Holiday: गणपती विसर्जन च्या दुसऱ्या दिवशीही सुट्टी जाहीर; राज्य शासनाने घेतले महत्वाचा निर्णय पाहा सविस्तर माहिती .

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

गणपती विसर्जन (अनंत चतुर्दशी ) गुरुवारी पार पडणार आहे. याच दिवशी ईद-ए-मिलाद हा सण आहे. पण ईद हा सण दुसऱ्या दिवशी साजरी करण्याचं मुस्लीम समुदयानं जाहीर केलं आहे. त्यामुळं गुरुवार अनंत चतुर्दशीची सार्वजनिक सुट्टी आहेच पण आता शुक्रवारी सुध्दा ईदची सुट्टी जाहीर करण्यात आली आहेत. आता गुरुवार आणि शुक्रवार हे दोन दिवस सार्वजनिक सुट्टी असणार आहेत .

(मुख्यमंत्री एकनाथ शिंदे)
मुख्यमंत्री कार्यालय मध्ये याबाबत महत्वाची माहिती दिली आहे. आता दोन्ही सण , अनंत चतुर्दशीनिमित्त गणेश विसर्जन आणि ईद-ए- मिलादचा सण एकाच दिवशी आले . म्हणजे उद्या गुरुवारी, २८ सप्टेंबर होणार असून गर्दी व मिरवणुक च योग्य व्यवस्थापन करणं पोलीस प्रशासनाला शक्य व्हावे त्यासाठी शुक्रवारी २९ तारखेला शासकीय सुट्टी जाहीर करण्याचा निर्णय राज्य शासनानं घेतला आहे.

शिष्टमंडळाची विनंती मान्य
ऑल इंडिया खिलाफत कमिटीच्या शिष्टमंडळानं याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन विनंती केले होते .आणि राज्यामध्ये शांततेचं वातावरण असावं आणि मिरवणुकि साठीच नियोजन करता येणं पोलिसांना शक्य व्हावं म्हणून २९ तारखेला सुट्टी देण्याची विनंती त्यांनी केले होते . या शिष्टमंडळात खासदार राहुल शेवाळे, आमदार अबू आझमी, आमदार रईस खान, नसीम खान आदींचा समावेश राहिला .


👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇