Ladki bahin Yojana 2024: राज्य शासनाने महाराष्ट्रामध्ये लेक लाडकी योजना ची सुरुवात केली आहे ज्यामध्ये महिलांना खात्यामध्ये 1500 रुपये प्रति माह इतकी रक्कम बहिणींच्या खात्यामध्ये वितरित करण्यात येत आहे 14 ऑगस्ट पासून राज्यातील महिलांच्या खात्यामध्ये 3000 रुपये दोन महिन्याचे पैसे एकदाच खात्यामध्ये वितरित केले आहे.
Ladki bahin Yojana 2024 details
आतापर्यंत 80 लाख महिलांच्या खात्यामध्ये ही रक्कम जमा करण्यात आली आहे 80 लाख महिलांना योजनेचा आतापर्यंत लाभ मिळाला आहे आणि राहिलेले महिलांच्या खात्यामध्ये उर्वरित रक्कम जमा करण्याची प्रोसेस चालू आहे. लेक लाडकी योजना यासाठी आतापर्यंत 1 कोटी पेक्षा जास्त अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यातील यादीमध्ये लाखापेक्षा जास्त महिलांचे अर्ज रिजेक्ट झाले आहे. तर काही महिलांना खात्यामध्ये रक्कम मिळाली नाही. त्यामधील न जमा होण्याचे कारण व त्याचे उपाय आम्ही खालील प्रमाणे दिले आहे. तुमची अर्जाची स्थिती व लिंक खालील प्रमाणे पाहू शकता .
Ladki bahin Yojana चे रक्कम कोणत्या खात्यात जमा होणार
लडकी बहीण योजनेची रक्कम कोणत्या खात्यामध्ये जमा झाले हे पाहण्यासाठी सर्वात प्रथम आपल्याला आधार कार्डच्या ऑफिशियल वेबसाईट https://uidai.gov.in/ या संकेतस्थळावर भेट देऊन सर्वप्रथम तुम्ही भाषा निवडा
भाषा निवडल्यानंतर खाली आधार सेवा (Aadhaar Services) हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा.
त्या नंतर आधार लिंकिंग स्थिती Aadhar linking status (Bank sending status) त्यावरती क्लिक करून लॉगिन(login) करा.
इथे तुमचे आधार कार्ड नंबर प्रविष्ट टाका. टाकल्यानंतर खाली तुम्हाला तिथे एक कॅपच्या दिसेल ते इंटर करा व लॉगिन विथ ओटीपी वर क्लिक करा.
क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली बँक सेंडिंग स्टेटस दिसणार ते ओपन करा.
ओपन केल्यावर तुम्हाला तिथे आपले बँकेचे नाव व आधार कार्ड नंबर चे लास्टचे फोर डिजिट दिसणार व पुन्हा तुम्ही त्या बँकेत जाऊन बॅलेन्स enquary करून लाडकी बहीण योजनेचे पैसे चेक करू शकता.
व ज्या महिलांचे खाते आधार लिंकिंग नसेल त्यांनी बँकेत जाऊन आधार लिंक करावे लागणार. लिंक केल्यानंतर महिलांच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचे रक्कम जमा होईल.
खात्यामध्ये पैसे जमा न होण्याची असे कारण असू शकतात
- 14 ऑगस्ट पासून रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे त्यामध्ये फक्त 48 लाख महिलांच्या खात्यामध्ये पैसे पुरवण्यात आले आहे. बाकीच्या महिलांच्या बँक खात्यामध्ये 17 ऑगस्ट पर्यंत पैसे येणार आहेत. त्यामुळे 17 ऑगस्ट पर्यंत महिलांनी वाट पहावी
- पैसे न जमा होण्याचे दुसरे कारण म्हणजे बँक सीडिंग स्टेटस असू शकते बँक खाते आधार कार्डशी लिंक नसल्यामुळे देखील पैसे जमा होऊ नाही शकत. असेही कारण असू शकते. त्यासाठी महिलांनी आधार कार्डच्या वेबसाईटवर जाऊन आधार सीडींग स्टेटस वरील प्रमाणे दिलेल्या प्रोसेस नुसार पाहू शकता.
- अर्ज भरून हि तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा होत नसतील तर काळजी करायची गरज नाही. रिजेक्ट झाल्या कारणाने देखील रक्कम मिळू शकत नाही त्यासाठी तुम्ही अर्जासमोर pending, disapproved, review ,असे दिसत असेल तर चिंता करण्याची काही गरज नाही. तुमच्या अर्जाची पडताळणी सुरू असल्यामुळे असे दिसून येते. त्यासाठी 17 ऑगस्ट या तारखेपर्यंत वाट पहावी.
खालील प्रमाणे अर्जाची पडताळणी करा.
- अर्ज भरता वेळेस चुकीची माहिती किंवा कागदपत्रे अपूर्ण असल्यामुळे अर्ज रिजेक्ट होऊ शकतो.
- काही महिलांच्या अहर्ता पूर्ण नसल्यामुळे देखील अर्ज रिजेक्ट होऊ शकते.
महिलेच्या बँकेचे देखील समस्या असू शकते आधार कार्ड लिंक नसणे किंवा खात्या संबंधित KYC चे समस्या राहू शकते.
विडिओ द्वारे समजून घेण्या साठी खालील प्रमाणे दिले आहे .