कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांसाठी आनंदाची बातमी! ‘टोलमाफी’ बद्दल सरकारनं घेतलेला हा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांनी जारी केला आदेश

कोकणात गणेशोत्सव हा सण साजरा करण्यासाठी (Konkan Ganeshotsav) जाणाऱ्या गणेश भक्त्तासाठी १६ सप्टेंबर ते १ ऑक्टोबर या काळात पथकर (toll ) माफी करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठरवलं आहे. त्यासंबंधी साठी शासन निर्णय प्रसिद्ध हि झालेले आहे.

मुंबई-बंगळुरु राष्ट्रीय महामार्ग, मुंबई-गोवा राष्ट्रीय महा मार्ग मध्ये आणि इतर सार्वजनिक बांधकाम विभागांच्या रस्त्यांवरील पथकर नाक्यांवर ही सवलत सुरु असणार आहे. गणेशोत्सव सनासाठी कोकणात प्रवेश करणाऱ्या गणेशभक्तांना टोलमाफीसह अनेक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्याचे आदेश मुख्यमंत्री यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिलेले आहे .

आणि त्यानंतर आज सार्वजनिक बांधकाम विभागाने पथकर सवलतीचा शासन निर्णय जारी केला आहे. या टोल माफी सवलत साठी (‘गणेशोत्सव २०२३), कोकण दर्शन’ अशा आशयाचे स्टीकर्स स्वरूपाचे पासेस हि परिवहन विभाग मार्फत , वाहतूक पोलिस, संबंधित प्रादेशिक परिवहन विभाग यांनी समन्वय साधून उपलब्ध करून द्यावेत, असे निर्देश देण्यात आले आहेत.

तसेच हा पास परतीच्या प्रवासा तही ग्राह्य धरला जाईल . पोलिस आणि परिवहन विभागा मार्फत ह्या गणेशोत्सव च्या काळात पास सुविधा बद्दल माहिती नागरिकांना कळण्यासाठी सूचना दिल्या आहेत.