महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत नवीन पदांसाठी भरती सुरु! पगार २५००० रुपये .पाहा सविस्तर माहिती .

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ अंतर्गत , मुंबई मुख्यालय येथे ” कार्यालयीन सहाय्यक ” या पदांसाठी कंत्राटी तत्वावर नियुक्ती करण्या बाबतीत.

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, कफ परेड, मुख्यालय, मुंबई येथे विविध विभागात ” कार्यालयीन सहाय्यक ” च्या एकूण ०६ पदाकरीता पात्र व इच्छुक महिला / पुरुष उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक उमेदवारांनी खालील लिंकवर जाऊन दि. २५.१०.२०१३ रोजी सांय. ०५.०० पर्यंत अर्ज सादर करावे.

ऑनलाईन अर्ज = CLICK HERE

सविस्तर जाहिरात व अधिक माहिती करिता maharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्यावी.

या प्रक्रियेसंदर्भातील अंतीम निर्णय महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचा राहील.

प्रस्तावना :-

महाराष्ट्रतील राज्य सुरक्षा महामंडळ हे शासनाचे वैधानिक महामंडळ आहेत . महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळा यांच्या मार्फत केंद्र व राज्य शासनाचे कार्यालये, त्यांचे उपक्रम, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, शासकीय किंवा निमशासकीय संस्था याद्वारे यांच्या बाबती तील स्वतंत्र तरतुदी करून निर्माण केलेले मोठे पुल, विशेष आर्थिक क्षेत्र, खाजगी बंदरे व लहान धक्के, धरणे व द्रुतगती मार्ग इत्यादी पायाभुत सुविधांना आणि मॉल्स, मल्टिप्लेक्स, क्लब, हॉटेल इत्यादी यांसह वाणिज्यिक आस्थापनांना, सक्षम प्राधिकारी यांनी केलेल्या विशेष विनंतीवरून सुसज्जय मनुष्यबळामार्फत व्यावसायिक सेवा पुरवून त्यांचे अधिक चांगले संरक्षण करण्याचे उद्देश व त्यांना सुरक्षा पुरविण्यासाठी अशा आस्थापनांना व संस्थांना तंत्रविषयक सल्ला देण्याकरीता मनुष्यबळाद्वारे सुरक्षा व संरक्षण पुरविणे हे महामंडळाचे प्रमुख उद्दिष्टे आहेत

महामंडळाच्या मुख्यालयातील विविध विभागात “कार्यालयीन सहाय्यक” एकूण ०६ पदावर निवड करणे तसेच एक वर्ष कालावधीत नव्याने निर्माण होणाऱ्या पदावर नियुक्तीसाठी एकूण ०५ उमेदवारांची प्रतिक्षाधीन यादी तथा नामिकासुची याकरीता प्रस्तुत जाहिरात देण्यात येत असून इच्छुक व पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे.

  • कार्यालयीन सहाय्यक एकूण ०६ पदे (आस्थापना, प्रतिष्ठापना इत्यादी विभागासाठी)
  • प्रतिक्षाधीन यादी तथा नामिकासुची एकूण ०५ पद

वरील पदांसाठी निकष :-

१. वय – ३१.१०, २०२३ रोजी ३५ वर्षापेक्षा अधिक नसावे.

२. नोकरीचे ठिकाण :- महामंडळाचे मुख्यालय, मरासुम, मुंबई.

३. वेतन :- २५,०००/-

  • शैक्षणिक पात्रता :-

१. उमेदवार हे मान्यताप्राप्त विद्यापीठ मधून कोणत्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक .

२. उमेदवार मराठी टायपिंग ३० श.प्र.मि. व इंग्रजी टायपिंग ३० श.प्र.मि. GCC चे शासनमान्य परिक्षा उत्तीर्ण असलेले राहावे .

३. उमेदवार MS-CIT परिक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक असून त्यास संगणकावरील MS Word, Excel

चे ज्ञान असणे आवश्यक आहे.

४. कार्यालयीन सहाय्यक , क्लर्क ,टायपिस्ट या पदासाठी खाजगी किंवा निम शासकीय / शासकीय आस्थापनामध्ये किमान ०३ वर्षाचा कामाचा अनुभव आवश्यक आहे.

  • अर्ज सादर करण्याची पध्दत :-

१. इच्छुक व पात्र उमेदवार CLICK HERE या लिंकवर जाऊन आपला अर्ज सादर करावा. तसेच अर्ज सादर केल्यानंतर त्याची पोचपावती empanelment.mssc@gmail.com या ई मेल आयडी वर पाठवावेत.

२. अर्ज सादर करण्याची शेवटची मुदत :-

अर्ज सादर करण्याची शेवटचा दिनांक १२.१०.२०२३ ते २५.१०.२०२३ पर्यत वेळ १८.०० वाजेपर्यंत.

  • मुलाखतीसाठी हजर रहावयाचे ठिकाण व दुरध्वनी क्र. :-

पोलीस महासंचालक तथा व्यवस्थापकीय संचालक

महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ/ मुंबई. सेंटर 1, 32 मज, वर्ल्ड ट्रेड सेंटर, कफ परेड, मुम्बई 400005.

दूरध्वनी: [022] 2215 1847, फॅक्स : [022] 22151867.

  • मुलाखतीवेळी उमेदवारांनी सादर करावयाची कागदपत्रे

१) वैयक्तिक माहिती ( BIO-DATA)

२) शैक्षणिक कागदपत्रे,

३) अनुभव प्रमाणपत्र

४) ०२ पासपोट साईज आकाराचे फोटो / पैन कार्ड / आधार कार्ड.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी = CLICK HERE

  • निवड प्रक्रिया :-

१. उमेदवारांचे प्राप्त कागदपत्रानुसार मुलाखतीसाठी बोलाविण्यात येता वेळेस उमेदवारांची यादी तयार करण्यात येणार , किमान अर्हता प्राप्त उमेदवारांनि मुलाखतीची वेळ दिनांक या संदर्भात भ्रमणध्वनी तसेच ई-मेलव्दारे कळविण्यात येणार .

२. उमेदवारांची महामंडळाचे कार्यालयात मराठी व इंग्रजी टायपिंग (ISM Software) पत्रलेखन, नस्ती लेखन तसेच Word, Excel इ. बाबत संगणकावर परिक्षा घेण्यात येईल. परिक्षेनंतर उमेदवारांची मुलाखत घेतली जाईल.

३. टायपिंग, मुलाखत, अनुभव इ. वर आधारित उमेदवारांसाठी नामिकासुची (प्रतिक्षाधीन यादी) तयार करण्यात येणार आणि महामंडळात उपलब्धी जागेनुसार या सूचीमधील गुणानुक्रम विचारनित घेऊन नियुक्ती देण्यात येईल .

४. निवडलेल्या उमेदवारास महामंडळाच्या अटी व शतींसह नियुक्ती पत्र दिले जाईल.

५. दिली जाणारी नियुक्ती ही करार पध्दतीने कंत्राटी तत्वावर ०१ वर्षांसाठी असेल व महामंडळाची आवश्यकता आणि प्रस्तुत कर्मचाऱ्यांची क्षमता, आत्मसात केलेले ज्ञान व इतर निकष यानुसार करार नूतनीकरण करण्यात येईल.

  • इतर सुचना :-

१. मुलाखतीसाठी उमेदवारांना स्वखर्चाने हजर राहावे लागेल.

२. हि जाहिराती मधील नमुद करण्यात आलेले पदसंख्या यामध्ये वाढ होण्याची शक्यता आहेत .

३. सदर निवड प्रक्रिया कोणत्याही वेळी कोणत्याही कारणास्तव / कोणत्याही टप्यावर / पुर्णत: किंवा अंशतः रद्द करण्याचा / फेरबदल करण्याचा अधिकार महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळ, मुंबई यांचेकडे राखून ठेवण्यात आलेला आहे.

४. उमेदवारांच्या नेमणुकीबाबत अंतिम निर्णय महामंडळाचा असावे .


👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇