भारता मध्ये नवरात्रोत्सव उत्साहाने साजरा केला जात आहे. नवरात्रोत्सव हा दुर्गा देवीला समर्पित केला जातो. नऊ दिवस दुर्गा देवीच्या नऊ रूपांची पूजा केली जातात . पण तुम्हा माहिती आहे का नवरात्रोत्सव नऊ दिवसांचे का असते ? नवरात्र यांचे अर्थ संस्कृतमध्ये ‘नऊ रात्री’ असा होतो. नऊ रूपे ऊर्जा आणि शक्तीच्या देवता मानल्या जाते . नवरात्रोत्सव आपण नऊ दिवस साजरा करत असतो . आणि त्या नंतर दहाव्या दिवसाला विजयादशमी हे सण साजरा केले जाते .
नवरात्रोत्सव नऊ दिवसांचा का?
नवरात्रीत सृजन शक्तीची पूजा केली जाते. कारण तेव्हा धान्य घरात येते. सृजन शक्ती व नऊ अंक यांचं साम्य आहेत . बी पेरल्यानंतर नऊ दिवसांत ते अंकुरते. गर्भधारणा झाल्यापासून नऊ महिने नऊ दिवसांनी मूल जन्माला येत. त्यामुळे निर्मिती किंवा सृजन म्हटलं की नऊ. त्यामुळे नऊ या संख्येला ब्रह्मसंख्या म्हटले जाते. तसेच जास्तीत जास्त मोठा अंक नऊ आहे. म्हणूनच नवरात्र ही नऊ दिवसांची मानली जाते.”
- आजचा रंग : जांभळा
जांभळ्या रंगाबद्दल माहिती : नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरीची पूजा केली जातात . जांभळा रंग हा महत्त्वाकांक्षा, ध्येय आणि उर्जेचे प्रतीक असते . जांभळा रंग हा लाल आणि निळा या रंगाच्या मिश्रणाने तयार होतो . या रंगा मध्ये निळ्या रंगाची स्थिरता आणि लाल रंगाची ऊर्जा दिसून येतात . त्या रंगाचा शरीर, मन बुद्धी आणि आत्मा या साऱ्यांवर खोल प्रभाव पडत असतो . जांभळा रंग आवडनाऱ्या लोकांना शोधक वृत्तीचे, नवीन गोष्टी शिकण्यासाठी उत्साही. मानवतावादी, नि:स्वार्थी, शांतताप्रिय, समाधानी, दूरदर्शी असते असे मानले जातात .