घरात दुसरी मुलगी झाल्यास आता सरकार देणार पैसे; प्रधानमंत्री मातृ वंदना योजना २.० द्वारे मिळणार पैसे-योजना जाहीर

महिला सक्षमि करण्यासाठी सरकार मार्फत सातत्याने नवनवीन योजना प्रसिद्ध केल्या जातात. केंद्र सरकारद्वारे पहिल्या आपत्यासाठी ५ हजार रुपये दिल्या जातात. अशातच आता पंतप्रधान मातृवंदना योजना २ जाहीर करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाने या योजनेची घोषणा केलेली आहे. आता यानुसार महिलेला दुसरे आपत्या मुलगी झाल्यास ६ हजार रुपये दिल्या जाणार आहे.

नारी भ्रूणहत्येचे वाढते प्रमाण लक्षात घेता ते थांबवन्यासाठी सरकारने या योजनेची घोषणा केलेली आहेत .

कुणा कुणाला मिळेल हा लाभ ?

ह्या योजनेचा लाभ हा आर्थिक उत्पन्न नुसार घेता येईल . . यासाठी स्त्री ज्या कुटुंबातील आहेत त्या कुटुंबाचे वार्षिक उत्तपन्न ८ लाखांपेक्षा कमी असणे , अशी अट आहे. आणि १८ ते ५५ वयोगटातील महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे .

जुळी मुले झाली तर लाभ मिळणार का ?

जर एखाद्या महिले ला दोन जुळ्या मुली झाल्या, किंवा जुळ्या मुलांमध्ये एक मुलगा आणि मुलगी झाली तरी देखील एका मुलीसाठीचेच पैसे त्या महिलेला मिळणार आहेत.

अर्ज कसा करायचा?

जर का तुम्हा या योजनेचा लाभ घ्यायचे असेल, तर सर्वप्रथम wcd.nic.in/schemes/pradhan-mantri-matru-vandana-yojana या योजनेच्या संदर्भातील अधिकृत वेबसाइटला तुम्ही भेट देऊन पाहू शकता.व योजने बद्दल संपूर्ण माहिती यावर तुम्हाला दिसेल . तेथे देण्यात आलेला फॉर्म भरल्यानंतर त्या संबंधित कागदपत्रे जोडून योजनेसाठी अर्ज करता येईल आणि योजनेचा लाभ घेता येईल.

बालकांमधील कुपोषणाचे प्रमाण कमी करता यावे आणि माता सशक्त राहावी,आश्या महिलांसाठी प्रधानमंत्री मातृवंदना २.० योजना हा लाभ देण्यात येतो.
त्याद्वारे आई व बाळाचे आरोग्य अबाधित राहण्यासाठी योग्य आहार घेणे गरजेचे असते.

नवीन GR पाहण्यासाठी= CLICK HERE

प्रधानमंत्री मातृवंदना २.० योजना लाभ मिळण्यासाठी आवश्यक माहिती.

लाभार्थी व त्यांचा पतीचे आधार कार्ड.
लाभार्थीचे आधार (Attached) बँक खाते.
गरोदर पणाची शासकीय आरोग्य संस्थेत 150 दिवसांच्या आत नोंद.
शासकीय संस्थेतील गरोदर कालावधी मधील तपासणी.
बाळाचा जन्मचा नोंदणी दाखला व प्रथम लसीकरण प्रमाणपत्र.
लाभार्थीना अटींचे पूर्तता झाल्यानंतर 30 दिवसांच्या आत लाभाची रक्कम अदा करण्यात ययेईल .
जननी सुरक्षा योजना अंतर्गत पात्र लाभार्थ्यां ना शासकीय संस्थेमध्ये तसेच शासनमान्य रुग्णालय मध्ये बाळंतपण झाल्यास या योजनेचे मिळणारे आर्थिक साहाय्य देखील मिळेल .

हे पण वाचा :  SBI Mudra Loan Application: आता तुम्हाला फक्त 5 मिनिटांत 50000 रुपयांचे मुद्रा लोन मिळेल, कसा करावा अर्ज पहा त्या बद्दल सविस्तर माहिती.

कोठे करावे संपर्क?

तुमच्या जवळील आशा, अंगणवाडी कार्यकर्ती, आरोग्य सेविका किंवा कोणतीही शासकीय आरोग्य संस्था येथे करावे .

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇