Ramai Aawas Yojana 2024 :रमाई आवास योजना 2024: अर्ज कसे करावे घरकुल यादी कसे पाहावे. पहा याबद्दल सविस्तर माहिती .

Ramai Aawas Yojana 2024 नमस्कार मित्रांनो तर आपण आज पाहणार आहोत की रमाई आवास योजनेसाठी अर्ज कसे करावे आणि त्याची यादी कुठे पाहता येणार याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.

आपल्याला माहीतच असणार की केंद्र आणि राज्य सरकार भारताच्या नागरिकांसाठी विविध प्रकारच्या योजना सोयीस्कर योजना काढतात . अशा योजनांची माहिती नागरिकांना माहिती असणे आवश्यक आहे. अशातच सरकारने रमाई आवास योजनेची नागरिकांच्या हितासाठी ही योजनेची अंमलबजावणी केली आहे आपल्या भारत देशात मोठ्या प्रमाणामध्ये दारिद्र रेषेखालील असणारे नागरिक आहेत ज्यांचे कमी उत्पन्न असणारे आणि लागणाऱ्या जीवनाशक वस्तूंची कमीपणा असणारे त्यांच्याजवळ स्वतःची घरे व्यवस्थित नसल्याने अशांसाठी ही योजना लाभदायक ठरते.

गरीबी मध्ये जीवन जगणारे नागरिक ग्रामीण तसेच शरीर भागामध्ये मोठ्या प्रमाणात आढळून येतात. त्यांच्या स्वतःकडे राहण्यासाठी घरांची बांधकाम नसते. अशा वंचित आणि बेगर व्यक्तींसाठी ही रमाई आवास योजनेची सुरुवात झाली आहे.

Ramai aawas Yojana 2024 रमाई आवास योजना 2024

आताच्या या काळामध्ये वाढत्या किमतीमुळे नागरिकांचे स्वतःच्या मालकीचे घर होणे ही शक्य होत नाही आहे आणि नागरिकांचे उत्पन्नामध्ये कमीपणा आल्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये व्यक्तींचे पालन पोषण करणे हे थोडेसे अवघड झाले आहे त्यामुळे या बहुतांश नागरिकांमधील ग्रामीण भागात राहणाऱ्या व्यक्तींचे झोपडी बांधून राहतात .या झोपडी मध्ये राहणारे सर्व नागरिक दुर्बल घटकांमध्ये मोडतात. दारिद्र रेषेखालील नावे असणाऱ्या पण इंदिरा आवास योजनेच्या मूळ प्रतीक्षा यादी मध्ये ज्यांचे ज्यांचे नावे यादीमध्ये आले नाहीत. अशा नागरिक बेगर आहेत व अनुसूचित जाती आणि नव बौद्ध पात्र लाभार्थी नागरिकांना ज्यांच्या जवळ ग्रामीण भागात घरे बांधण्यासाठी स्वतःची जमीन नाही.अशा अनुसूचित नागरिकांसाठी महाराष्ट्र सरकारने रमाई आवास योजनेअंतर्गत त्यासाठी अनुदान उपलब्ध करून देणार आहे.

रमाई आवास योजना 2024 वैशिष्ट्ये

  • योजना अंतर्गत लाभार्थी निवड करण्यात येते.
  • रमाई आवास योजना ही महाराष्ट्र सरकार मार्फत चालू करण्यात आलेली योजना आहे.
  • गरजू व्यक्तीला आवास योजनेअंतर्गत लाभ घेता येणार
  • रमाई आवास योजनेसाठी घरबसल्या मोबाईल किंवा कॅम्पुटर च्या साह्याने ऑनलाईन आवेदन करू शकतात.
  • या योजनेमार्फत ज्या नागरिकांचे घरे कच्ची आहे अशा नागरिकांसाठी पक्के गरे बांधण्यासाठी आर्थिक सहाय्य प्रदान केले जाते.
  • राज्यांमधील साधारण क्षेत्रासाठी 1 लाख बत्तीस हजार रुपयांची अनुदान देण्यात येईल.
  • शहरी भागांमधील अनुदान 2 लाख 50 हजार रुपये देण्यात येईल.
  • या योजनेमध्ये नारेगा मार्फत लाभार्थीस 90 दिवसांची रोजगार उपलब्ध केल्या जाईल यासाठी लाभार्थ्यास 18 हजार रुपये दिले जातात.
  • रमाई आवास योजनेअंतर्गत घरकुलाची लाभ मिळण्यासाठी अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नवबौद्ध प्रवर्गातील जे अपंग लाभार्थी आणि दारिद्र्यरेषेखालील नाहीत व त्यांची अपंगत्व 40 टक्के पेक्षा जास्त आहे व त्यांच्या वार्षिक उत्पन्नामध्ये एक लाख पर्यंत आहे.
  • अपंग हे लाभार्थी योजनेमधील इतर अटी पूर्ण करीत असणारे त्यांना रमाई आवास घरकुल योजनेचा लाभ मिळू शकतो.
  • राज्यामध्ये असणाऱ्या काही बेघर नागरिकांकडे स्वतःच्या मालकीची जागा उपलब्ध नसल्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेणे अशक्य होते .अशा नागरिकांकरिता शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय योजना च्या माध्यमातून जागा खरेदी करण्यासाठी पन्नास हजार रुपये ची निधी उपलब्ध करून दिला आहे.

Ramai aawas Yojana 2024 उद्देश

राज्या मधील नागरिकांना राहण्यासाठी स्वतःची घरी नाहीत अशा कुटुंबासाठी रमाई आवास योजनेअंतर्गत चे मुख्य उदेश आहे.

Ramai aawas Yojana 2024 लाभार्थी

१. ज्यांच्याजवळ पक्की घरे नाहीत अशा झोपडीत राहणाऱ्या कुटुंबांसाठी या योजनेचे लाभ घेऊ शकतात.

२.या योजनेमार्फत फक्त अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नवबौद्ध असणाऱ्या नागरिकच या योजनेचे लाभ घेऊ शकतात.

हे पण वाचा :  pradhan mantri awas yojana प्रधानमंत्री आवास योजने च्या ग्रामीण भागातील लाभार्थी यांचे यादीतील नाव कसे तपासायचे.

३.महाराष्ट्र मधील राहणाऱ्या आर्थिक दृष्टी गरीब व कमी उत्पन्न असणारे ज्यांच्याजवळ राहण्यासाठी स्वतःची घरे नाहीत अशा व्यक्तींसाठी ही योजना लाभदायक ठरते
४.महाराष्ट्र मध्ये राहणाऱ्या गरीब व स्वतःचे पक्के घरी बांधण्यासाठी उत्पन्न पैशाची कमतरता असलेल्या नागरिकांना योजनेची आर्थिक लाभ मिळू शकते.

५.Ramai aawas Yojana 2024 योजना अंतर्गत लाभार्थ्यांची निवड व कार्यपद्धती

६.या योजना अंतर्गत लाभार्थ्यांची निवड हे सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण 2011 नुसार पारदर्शक प्रमाणे केली जाते.

७.अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नवबौद्ध घटकांमधील ज्यांना स्वतःची घरे नाहीत अशा नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येईल.

८.या योजनेअंतर्गत लाभार्थ्यां ची निवड करत असताना ग्रामसभा पंचायत समिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत त्या स्थळावर योग्य ती कारवाई करून त्यांच्यामार्फत मंजूर करण्यात येते.

९.शहरी भागामध्ये महानगरपालिका नगरपालिका यांच्यामार्फत मंजूर करण्यात येते.

१०.या योजनेच्या लाभार्थ्यांना निवड मध्ये अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नव बौद्ध प्रवर्गामधील लाभार्थ्यांना तीन टक्के घरकुलाची मंजुरी देणे बंधनकारक आहे.

११.या योजनेअंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांमधून लॉटरीच्या पद्धतीने लाभार्थ्यांची निवड घेण्यात येईल.

Ramai aawas Yojana 2024 फायदे

  • रमाई आवास योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नवबौद्ध प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या गरीब नागरिकांची मदत होईल.
  • रमाई आवास योजना अंतर्गत वंचित आणि गरीब कुटुंबीयांना त्यांच्या हक्काचे घर मिळेल.
  • बीपीएल कार्ड धारक असलेले या योजनेची लाभ घेऊ शकतील. शहरी भागामध्ये घरे बांधण्यासाठी या योजनेमध्ये 2.5 लाख रुपयांची लाभ दिला जातो.
  • घर बांधण्यासाठी एक पॉईंट तीन लाख रुपयांची सर्वसाधारण भागामध्ये मदत केली जाते.
  • रमाई आवास योजनेअंतर्गत डोंगर क्षेत्रामध्ये घराचे बांधकाम करण्यासाठी एक पॉईंट 42 लाख इत इतके रुपयांचे सहायता मिळते.
  • योजनेच्या मार्फत शौचालय बांधकाम करण्यासाठी बारा हजार एवढी रक्कम ची तरतूद केली जाते.

Ramai aawas Yojana 2024 term and condition

रमाई आवास योजना अंतर्गत अर्ज केलेल्या व्यक्तीचा कुटुंबांमधील जर कोणताही व्यक्ती सरकारी सेवेसाठी असलेला असेल तर ते अर्ज करणाऱ्या व्यक्तीस या योजनेचा लाभ नाही घेता येणार.

  • अर्ज केलेल्या व्यक्तीने या अगोदर कोणत्याही घरकुल संबंधित योजनेचा लाभा घेतलेला नसावा.
  • अर्ज केलेल्या व्यक्तीने या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील मूळ रहिवासी असावे त्यासाठी प्रमाणपत्र सादर करावे आवश्यक आहे.
  • महाराष्ट्र राज्य बाहेर असलेले व्यक्तींना या योजनेमधील लाभ नाही घेता येणार.
  • अर्ज केलेल्या व्यक्ती अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नवबौद्ध वर्गामध्ये मोडणारा असावा त्यासाठी व्यक्तीने त्यासोबत जातीचे प्रमाणपत्र जोडणे गरजेचे आहे.
  • ग्रामीण भागामध्ये राहणाऱ्या व्यक्तीस एक लाख वीस हजार रुपये पर्यंत वार्षिक उत्पन्न असणे गरजेचे आहे.
  • नगरपरिषद भागामध्ये राहत असणाऱ्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न एक लाख तीस हजार रुपये असणे आवश्यक आहे.
  • जर लाभार्थी मोठ्या शहरांमध्ये किंवा महानगर पालिका अंतर्गत येत असल्यास त्यांची वर्षाचे उत्पन्न दोन लाख रुपये पर्यंत असावे व उत्पन्नाचा दाखला असणे आवश्यक आहे.
  • रमाई आवास योजनेचा लाभार्थी चे घर पक्क्या घराच्या स्वरूपात नसावे.

रमाई आवास योजना 2024 अनुदान व वितरण पद्धती

1.सुरू हप्ता

लाभार्थ्याच्या घराचे 50 टक्के अनुदान बांधकाम सुरू असताना लाभार्थ्याच्या चालू असलेल्या बँक खात्यामध्ये जमा करतात.

दुसरा हप्ता

निधीचा वापर केल्यानंतर 50% व प्रमाणपत्र सादर केल्यानंतर 40% अनुदान इतक्या अनुदान लाभार्थ्याच्या बँक अकाउंट मध्ये वितरित करण्यात येईल.

तिसरा हप्ता

घराचे बांधकाम संपूर्ण झाल्यावर घराचे ताबा घेत असताना व सक्षम अधिकारी घराचे बांधकाम संपूर्ण झाल्यानंतर दाखला मिळाल्यानंतर उरलेले दहा टक्के अनुदान हे योजनेच्या लाभार्थीच्या अकाउंट मध्ये वितरित करण्यात येईल.

Ramai aawas Yojana 2024 साठी लागणारे आवश्यक कागदपत्रे

  • पॅन कार्ड
  • इलेक्शन कार्ड मतदान कार्ड
  • आधार कार्ड
  • बीपीएल प्रमाणपत्र
  • योजनेसाठी पात्र असलेले लाभार्थ्या चे जातीचे प्रमाणपत्र
  • असेसमेंट पावती
  • घराची टॅक्स पावती
  • लाभार्थ्यांचे पासपोर्ट साईज फोटो
  • घराची बांधकाम करत असलेल्या जागेवर हिस्से असल्यास संमती पत्र
  • जन्माचा दाखला
  • योजनेचे लाभ न घेतलेले प्रमाणपत्र
  • पूरग्रस्त भाग असलेले असल्यास प्रमाणपत्र
  • लाभार्थी पीडित असल्यास त्या व्यक्तीचा दाखला
  • चालू वर्ष असलेले त्यात कुटुंबाचा उत्पन्न चा दाखला
  • पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असलेल्या लाभार्थीचे प्रमाणपत्र
  • रेशन कार्ड मध्ये लाभार्थ्याचे नाव असणे अत्यंत आवश्यक आहे.
  • स्टॅम्प पेपर शंभर रुपयाची असणे व त्यावर टंकलिखित प्रतिज्ञापत्र.
  • लाभ घेणाऱ्या व्यक्तीचे बँकेमधील अकाउंट जॉइंट अकाउंट असणे आवश्यक आहे.
👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇