SBI Mudra Loan Application: आता तुम्हाला फक्त 5 मिनिटांत 50000 रुपयांचे मुद्रा लोन मिळेल, कसा करावा अर्ज पहा त्या बद्दल सविस्तर माहिती.

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

SBI बँके कडून ग्राहकांना आश्या अनेक सुविधा दिल्या जात आहेत . SBI मुद्रा कर्जासाठी अर्ज केल्यावर, ग्राहकांना 50000 रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. अशा बँकिंग सेवांसाठी एसबीआयने एसबीआय व्हॉट्सअँप बँकिंग सुरू केले आहे.

SBI बँक मुद्रा कर्ज SBI मुद्रा कर्जासाठी आता जास्त कागदोपत्री गरज नाही किंवा बँकेत जाण्याची अवशक्यता नाही. तुम्ही तर घरबसल्या SBI मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकता. आज या लेखामध्ये आम्ही तुम्हाला SBI मुद्रा कर्जासाठी अर्ज कसा करावा हे सांगणार आहोत.

state bank of india मुद्रा कर्ज घेण्याचे फायदे?{Mudra Loan}

SBI मुद्रा कर्ज मायक्रो-युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी (MUDRA) योजनेअंतर्गत प्रदान केले जाते. तुम्ही देशातील लहान आणि मध्‍यम व्‍यावसायिक ज्यांचा आधीपासून व्यवसाय आहे किंवा ज्यांना आपला व्‍यवसाय वाढवायचा आहे ते SBI कडून मुद्रा कर्जासाठी अर्ज करू शकतात.

या कर्जामुळे ते केवळ नवीन व्यवसायच उघडू शकत नाहीत तर त्यांच्या व्यवसायात गुंतवणूक देखील करू शकतात जेणेकरून त्यांचा व्यवसाय चांगला वाढेल. मुद्रा कर्ज, SBI अंतर्गत, तुम्ही ऑनलाइन अर्ज करून व्यवसायासाठी 50,000 रुपयांपर्यंत कर्ज मिळवू शकता.

यासाठी एसबीआयमध्ये बचत खाते किंवा चालू खाते असणे आवश्यक आहे. याशिवाय, तुमच्याकडे तुमच्या व्यवसायाची कागदपत्रेही असली पाहिजेत, तरच तुम्ही या कर्जासाठी अर्ज करू शकता.

SBI मुद्रा loan साठी अर्ज कसा करावा?

सर्वप्रथम तुम्हाला स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) ई-चलन पोर्टलच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल.
वेबसाइटच्या होमपेजवर Proceed for e-Mudra या पर्यायावर क्लिक करा. तुमच्यासमोर एक नवीन पेज उघडेल.
येथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर आणि कॅप्चा कोड टाकावा लागेल, तुमचा खाते क्रमांक आणि कर्जाची रक्कम टाकावी लागेल आणि पुढे जा बटणावर क्लिक करावे लागेल.
कर्ज मंजुरीचा एसएमएस मिळाल्या नंतर ३० दिवसांच्या आत हि प्रक्रिया पूर्ण करावी लागेल.

SBI ई-मुद्रा कर्जासाठी नियम व अटी

1.अर्जदाराचे SBI मध्ये चालू किंवा बचत खाते (किमान 6 महिने जुने) असणे आवश्यक आहे.
2.कमाल कर्जाची रक्कम 1 लाख रुपयांपर्यंत
3.कमाल परतफेड कालावधी 5 वर्षांपर्यंत आहे.
4.बँक 50,000 रुपयांचे तात्काळ कर्ज देईल
5.तुम्हाला 50,000 रुपयांपेक्षा जास्त कर्ज हवे असेल, तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या SBI बँक च्या शाखेत जावे लागेल.
6.SBI मुद्रा कर्ज फक्त बिगर कृषी व्यवसायांसाठी दिले जाईल.
7.कर्ज घेण्यासाठी व्यक्ती नॉन-डिफॉल्टर असणे आवश्यक आहे.
8.केवळ व्यक्ती आणि लहान व्यावसायिक घटक यासाठी अर्ज करू शकतात.
9.तुमच्या व्यवसायाची कागदपत्रे असणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे.
10.केवळ 18 ते 60 वयोगटातील नागरिकांनाच या योजनेचा लाभ घेता येईल.
11.छोट्या व्यावसायिकांना या कर्जाची परतफेड करण्यासाठी ३ ते ५ वर्षांचा कालावधी दिला जातो.

SBI मुद्रा लोन घेण्यासाठी तुम्हाला या कागदपत्रांची आवश्यकता असेल.

1.आधार कार्ड
2.बँक खाते बचत/चालू खाते क्रमांक तपशील
3.उद्योग आधार क्रमांक आणि जीएसटीएन आणि
4.आपले व्यवसाय दस्तऐवज
5.व्यवसाय पत्ता पुरावा
6.UIDAI- आधार क्रमांक (बँक खात्या सोबत लिंक करणे आवश्यक आहे)
7.जातीचे वर्णन
8.दुकान आणि आस्थापना आणि व्यवसाय नोंदणीचा ​​पुरावा

टीप – सर्व कागदपत्रे PDF/JPEG/PNG फॉरमॅटमध्ये अपलोड करावीत. दस्तऐवज कमाल 2MB च्या फाइल आकारासह अपलोड करणे आवश्यक आहे.

SBI मुद्रा लोन अंतर्गत किती प्रकार चे loan उपलब्ध आहे ?

SBI मुद्रा कर्जामध्ये 3 प्रकारचे कर्ज दिले जाते. जे खालील प्रमाणे आहेत –
1)शिशू लोन – शिशू लोन अंतर्गत तुम्ही 50,000 रुपयांपर्यंत कर्ज घेऊ शकता.
2)किशोर कर्ज – किशोर कर्जा मध्ये , 50,000 ते 5 लाख रुपयां पर्यंतचे कर्ज दिले जातात .
3)तरुण कर्ज- तरुण कर्ज अंतर्गत, ज्यांचे मोठे व्यवसाय आहेत ते गुंतवणुकीसाठी 5 लाख ते 10 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेऊ शकतात.

SBI मुद्रा कर्जाशी संबंधित काही प्रश्न आणि उत्तरे:-

SBI मुद्रा लोन कसे मिळवायचे?
यासाठी तुम्हाला एसबीआयच्या ई-मुद्रा लोन पोर्टल emudra.sbi.co.in वर जावे लागेल. वरील लेखात दिलेल्या प्रक्रियेचे अनुसरण करून तुम्ही SBI मुद्रा कर्जासाठी सहजपणे अर्ज करू शकता.

SBI मुद्रा कर्ज किती भागात विभागले आहे?
SBI ई-मुद्रा कर्ज 3 भागांमध्ये विभागलेले आहे – शिशु कर्ज, किशोर कर्ज, तरुण कर्ज.

मुद्रा लोन SBI साठी ऑफलाइन अर्ज कसा करावा?
तुम्ही ऑनलाइन अर्ज करू शकत नसल्यास, तुम्ही SBI मुद्रा कर्जासाठी ऑफलाइन अर्ज करू शकता. यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या SBI शाखेत जाऊन फॉर्म भरावा लागेल.

SBI ई-मुद्रा कर्जावरील व्याजदर कोण ठरवतो?
SBI मुद्रा कर्जावरील व्याजदर RBI मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे ठरवले जातात.

अशा आणखी सरकारी योजनांबद्दल माहिती मिळवण्यासाठी, कृपया आमची वेबसाइट localnews18.com वर माहिती मिळवा.


👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇