Cooperative bank bharti 2024.मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड . सटाणा जिल्हा नाशिक मध्ये प्रशासकीय अधिकारी. लेखापाल. शाखा अधिकारी आणि लिपिक या रिक्त पदांच्या भरती.

Cooperative bank bharti 2024 नमस्कार मित्रांनो दि. सटाणा मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड . सटाणा जिल्हा नाशिक मध्ये प्रशासकीय अधिकारी ,लेखापाल, शाखाधिकारी अधिकारी आणि लिपिक या रिक्त पदांच्या भरतीसाठी महाराष्ट्र अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक फेडरेशन लि .मुंबई यांच्या मार्फत फक्त ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागण्यास सुरुवात झाली आहे. सदरील जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने दिनांक 30/ 04 /2024 ते 14/ 05/ 2024 पर्यंत आपले अर्ज भरावे.

Cooperative bank bharti 2024 details

विभागदि सटाणा मर्चंट्स को ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड
जिल्हानाशिक
रिक्त पदेप्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखा अधिकारी, आणि लिपिक
पदांची संख्यावेगवेगळे, मूळ जाहिरात पहावे
अर्ज प्रक्रियाऑनलाइन
शैक्षणिक पात्रतामान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी
अधिकृत वेबसाईटwww.mucbf.in
अर्ज सुरुवातीची तारीख30/04/2024
अर्ज करण्याची शेवटची तारीख14/05/2024 रात्री 11:59 पर्यंत


Cooperative bank bharti 2024 शैक्षणिक पात्रता

त्यासाठी उमेदवारांकडे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी असावी.
MS-CIT अथवा समतूल्य संगणक कोर्स प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा


परीक्षेचे निकाल जर विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर अद्यावत केला गेला असेल किंवा वेब आधारित प्रमाणपत्र प्रदान केले गेले असेल तर उमेदवारांनी त्यासंदर्भात मूळचे प्रमाणपत्र बँकेला सादर करणे आवश्यक राहील आणि त्या विद्यापीठाच्या अधिकृत अधिकाऱ्याने सदरहून उमेदवारी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याची तारीख दर्शवून सही करणे आवश्यक राहील.

Cooperative bank bharti 2024 अर्ज करण्यासाठी फी

अर्ज करण्यासाठी शुल्क 500 + 18 % जीएसटी असे एकूण 590 {विना परतावा }ऑनलाइन पेमेंट.
उमेदवारांना अर्ज करता वेळेस अडचणी किंवा शंका आढळल्यास संकेतस्थळावर उपलब्ध असणार हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधून समस्या सांगू शकता.

Cooperative bank bharti 2024 निवड पद्धत

सदरील भरती प्रक्रियेत परीक्षा बँक मार्फत राबविण्यात येईल पात्र उमेदवारांची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाईल.


ऑफलाइन परीक्षा
लिपिक पदांसाठी 100 गुणांची बहुपर्यायी प्रश्नांची ऑफलाइन पद्धतीने इंग्रजी माध्यमातून परीक्षा घेण्यात येईल पर्यायी स्वरूपाच्या प्रश्नांमध्ये गणित इंग्रजी भाषा आणि व्याकरण संगणक आणि सहकार ज्ञान बौद्धिक चाचणी बँकिंग आणि सामान्य ज्ञान या विषयावरील प्रश्नांचा समावेश असेल त्यानंतर शंभर पैकी प्राप्त दोघांचे 90 च्या गुणोत्तरांमध्ये रूपांतर करण्यात येईल.

कागदपत्रे पडताळणी
उमेदवाराची ऑफलाइन परीक्षेतील गुणांच्या उतरत्या क्रमवारीनुसार बँक धोरणाप्रमाणे मुलाखतीपूर्वक शैक्षणिक व इतर संबंधित मूळ प्रमाणपत्रकांची प्राथमिक कागदपत्रे पडताळणी बोलवण्यात येईल त्यावेळी उमेदवाराने मूळ कागदपत्रे उपलब्ध करून देणे आवश्यक आहे प्राथमिक कागदपत्रे पडताळणीमध्ये पात्र होणारा उमेदवारास बँक धोरणाप्रमाणे बँकेकडून मुलाखतीस बोलवण्यात येईल

मुलाखत
उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांच्या बँकेच्या धोरणानुसार भरवायचे पदसंख्येच्या प्रमाणात ऑफलाइन परीक्षेच्या गुणा अनुक्रमे मुलाखतीस बोलण्यात येईल मुलाखतीकरिता दहा गुण शैक्षणिक पात्रेकरता पाच गुण व मौखिक मुलाखतीकरिता पाच गुण गरोदर राहिल्यास संबंधित उमेदवार अंतिम निवडीस् परीक्षा उत्तीर्ण झालेला असला तरी पात्र राहणार नाही.

हे पण वाचा :  farmers schemes in india: केवळ थोडं वेळ आहे, फक्त क्षणात होणार शेतांवर खाद्याने फवारले; सरकार किसान ड्रोनसाठी प्रत्याय देत आहे


उमेदवाराची अंतिम निवड सूची
उमेदवारांची ऑफलाईन परीक्षेतील गुण व अधिक मुलाखतीचे गुण यांची बेरीज करून एकूण शंभर गुणांपैकी अंतिम निवड सूची तयार करण्यात येईल.

Cooperative bank bharti 2014 वयोमर्यादा

यासाठी उमेदवारांचे वय दिनांक 30/04 /2024 रोजी किमान 30 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. यासाठी मूळ जाहिरात पहावे.

Cooperative bank bharti 2024 महत्त्वाचे सूचना

उमेदवारांकडे परीक्षा शुल्क तसेच अर्ज शुल्क या संकेतस्थळावर अद्यावत केल्याशिवाय रजिस्ट्रेशनची प्रक्रिया संपूर्ण होणार नाही याची काळजी घ्यावी.


उमेदवारांकडे असलेले ईमेल आयडी व मोबाईल क्रमांक हे वैद्य असावे. जसे निवड प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत वैद्य असलेले ईमेल आयडी सक्रिय असले पाहिजे. त्यासोबतच मोबाईल क्रमांक NCPR रजिस्टर (DND)असल्यामुळे संपूर्ण प्रोसेस त्याद्वारे पाठवल्या जाणाऱ्या सूचना मेसेज व माहिती उमेदवारांना प्राप्त न झाल्यास याची संपूर्ण जबाबदारी ही उमेदवाराची राहील. ईमेल आयडी व मेसेज येणाऱ्या संदेश वाहनांमध्ये होणाऱ्या तांत्रिक अडचणींचा फेडरेशन व बँक जबाबदार राहणार नाही सदर भरती प्रक्रिया दरम्यान फेडरेशन संकेतस्थळावर दरवेळेस अवलोकन करून भरती प्रक्रियेची माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील

उमेदवारांनी अर्ज भरताना सदर पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करुनच अर्ज भरावा. उमेदवारांचे अर्ज ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येणार असल्याने अर्ज करताना शैक्षणिक कागदपत्रके, अन्य प्रमाणपत्रके व पुरावे जोडणे आवश्यक नाही. तथापि ऑनलाईन अर्जामध्ये उमेदवाराने त्याचे पात्रतेनुसार काळजीपूर्वक संपूर्ण व खरी माहिती भरणे आवश्यक राहील. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरताना काही चुका झाल्यास किंवा त्रुटी राहिल्यास भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर अर्ज नाकारला गेल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील व याबाबत उमेदवारास कोठेही ब कोणत्याही प्रकारे तक्रार करता येणार नाही. ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती अर्ज सादर केल्यावर बदलता येणार नाही.

सदर भरती प्रक्रियेदरम्यान संकेतस्थळावर असलेल्या सूचनांचे वेळोवेळी अवलोकन व पालन करुन भरती प्रक्रियेची अद्ययावत माहिती प्राप्त करण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील.

इच्छुक उमेदवारांनी अर्जातील माहिती पूर्ण भरुन वैध ई-मेल अँड्रेससह जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखेपासून १५ दिवसांत सदर अर्जाची ऑनलाईन पद्धतीने दि. १४/०५/२०२४ पर्यंत रात्री ११:५९ वाजेपर्यंत नोंदणी करावी. त्यानंतर आलेल्या अथवा अर्जासोबत परीक्षा शुल्क/अर्ज शुल्क न भरणाऱ्या अर्जांचा विचार केला जाणार नाहो. लिपिक पदाकरिता उमेदवारांची १ ०० गुणांची बहुपर्यायी प्रश्‍नांची ऑफलाईन पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल. प्रशासकीय अधिकारी, लेखापाल, शाखाधिकारी ब अधिकारी पदांकरिता भरती प्रक्रिया बँकेमार्फत राबविण्यात येईल व पात्र उमेदवारांची मुलाखत बँकेमार्फत घेतली जाईल.

लिपिक पदाकरिता उमेदवाराची बहुपर्यायी प्रश्‍नांची परीक्षा ही ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या पात्रतेनुसार कोणत्याही कागदपत्रकांची पूर्व तपासणी/छाननी न करता घेण्यात येणार असल्याने, या परीक्षेत मिळालेल्या गुणांच्या आधारे उमेद्वारांना निवडीबाबत कोणताही हक्क राहणार नाही. कागदपत्रकांच्या पूर्ण छाननी व तपासणीनंतरच त्यांची वैधता पाहून उमेदवाराची पात्रता निश्‍चित करण्यात येईल. सदर छाननी प्रक्रियेत उमेद्वार कोणत्याही टप्प्यावर अपात्र आढळल्यास त्यास निवड प्रक्रियेतून बाद करण्यात येईल. पात्रता धारण न करणाऱ्या उमेद्वारांना भरतीच्या कोणत्याही टप्प्यावर अपात्र करण्याचे संपूर्ण अधिकार फेडरेशनने व संबंधित बँकेने राखून ठेवलेले आहेत व याबाबत उमेद्वारांना मागाहून कोणतीही तक्रार करता येणार नाही.

उमेद्वारांना ऑफलाईन परीक्षा/कागदपत्रके पडताळणी व प्रत्यक्ष मुलाखतीस स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची मुलाखतीद्वारे निवड केली जाईल. अपात्र उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत दिले जाणार नाही.

लिपिक पदाकरिता परीक्षेचे ठिकाण व दिनांक, परीक्षेचे स्वरुप इ. बाबतची माहिती पात्र उमेद्वारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

मुलाखतीचे वेळापत्रक उमेद्वारांना फेडरेशनच्या संकेतस्थळावर कळविण्यात येईल.

उमेदवाराने अर्जात नमूद केलेली सर्व माहिती व तपशील अचूक असावा. सदर माहिती अथवा तपशील चूकीचा अथवा खोटा आढळल्यास सदर उमेदवाराचा अर्ज नोकरभरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द करण्यात येईल, याची कृपया नोंद घ्यावी.

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

Leave a Comment