आता आयुष्यमान गोल्डन कार्ड तुम्ही तुमच्या मोबाईल द्वारे काढू शकता. कसे काढावे त्याबद्दल सविस्तर माहिती.

केंद्र सरकार व राज्य सरकार हे राज्यांमधील नागरिकांसाठी विविध योजना राबवतात . अशातच आता सरकारने आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड हे सुरू केले आहे या योजनेच लाभ आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असणार आहे. आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड काढले असल्यास रुग्णांना हॉस्पिटलमध्ये पाच लाख रुपये पर्यंतचे फ्री मध्ये उपचार करता येईल.

आयुष्यमान भारत हेल्थ कार्ड कोणत्या पद्धतीने काढता येईल.

खालील प्रमाणे दिलेले सर्व माहिती पहिल्यास आपल्याला सर्व माहिती दिसून येईल. व त्याप्रमाणे तुम्ही आयुष्यमान कार्ड तयार करू शकता.

त्यासाठी सर्वात प्रथम

आपल्याला pmjay च्या अधिकृत वेबसाईटला भेट द्यावी लागेल pmjay.gov.in

  • वेबसाईटला भेट दिल्यानंतर त्या होम पेजवर जा पुन्हा ami eligible असा ऑप्शन दिसणार त्यावर जाऊन तुम्ही गोल्ड कार्ड साठी पात्र आहात की अपात्र आहात ते चेक करू शकता पण जास्त प्रमाणात या पोर्टलचे सर्व बिझी असल्याकारणाने आपल्याला ते पाहता येत नाही त्यामुळे दुसऱ्या पर्यायाची माहिती पाहूया.
  • वेबसाईट ओपन झाल्यावर डाव्या बाजूला वरच्या भागात menu ऑप्शन दिसणार त्याच्यावर क्लिक करायचा आहे.
    पुन्हा portal ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करा आता त्याच्यात तुम्हाला village level SECC data अशा प्रकारची दिसून येईल त्यावर ती क्लिक करा.

  • नंतर पुढच्या पेजवर तुम्हाला मोबाईल नंबर प्रवेश करायचे आहे व गेट OTP वरती क्लिक करून थोड्याच वेळामध्ये तुमच्या मोबाईल नंबर वर एक OTP येणार तो टाकावे लागणार व OTP टाकल्यावर लॉगिन वर क्लिक करा.

  • आता पुढील पेजवर तुम्हास इंटर फेस चा ऑप्शन दिसेल त्यांनी विचारलेल्या प्रश्नांची माहिती टाकून पुन्हा या योजनेसाठी पात्र आहे की नाही ते चेक करू शकता.
  • Aayushman Bharat health cardत्या पेजवर विचारलेली सर्व माहिती तुम्हाला टाकायची आहे.

१.राज्याचे नाव
२.जिल्ह्याचे नाव
३.ब्लॉक प्रकार
४.ग्रामीण भागातील रहिवासी असाल तर ब्लॉक ऑप्शन निवडा व शेरी भागात असाल तर ulb क्लिक करा.
५.तालुका किंवा जवळील मोठे गाव
६.तुमच्या गावाचे नाव

लास्ट ला सर्च ऑप्शन वर क्लिक करावे.

  • तुम्हाला आता तुमच्या गावातील व्यक्ती या योजनेसाठी पात्र आहे त्यांच्या नावांची लिस्ट तुम्हाला डाऊनलोड करावे लागणार यासाठी स्क्रोल खाली करून पीडीएफ आयकॉन वरती क्लिक करा.

 

  • क्लिक केल्यानंतर ती pdf उघडा लिस्ट मधील तुम्हाला आपले नाव शोधावे लागणार जर त्यामध्ये आपले नाव असेल तर तुमच्या नावाआधी एक फॅमिली आयडी राहणार तो id कॉपी करून सेव करा किंवा फोटो घ्या.

 

  • त्यानंतर तुम्हाला केवायसी करावी लागणार ही केवायसी तुम्ही आपल्या जवळील सरकारी हॉस्पिटल किंवा सचिबुद्ध असलेल्या प्रायव्हेट हॉस्पिटल वर तुम्हाला फॅसिलिटी उपलब्ध राहील. किंवा कोणत्याही जन सुविधा केंद्र असलेल्या सीएससी सेंटर मार्फत तुम्हाला ही सुविधा मिळून जाईल त्या जागी तुम्ही 30 रुपयाची फी भरून ती केवायसी ची प्रक्रिया पूर्ण प्रमाणे करू शकता.
हे पण वाचा :  SSC exam result date Maharashtra board दहावीच्या निकाल बाबत मोठी अपडेट. 27 मे या दिवशी लागणार दहावीचा रिझल्ट…? पहा संपूर्ण माहिती.

 

  • तर केव्हाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दहा दिवसा नंतर तुमचे कार्ड इशू केला जाणार इशु झाल्यानंतर तुम्हाला एक नोटिफिकेशन मिळेल व त्यानंतर तुम्ही पोर्टलवर भेट देऊन तुम्ही स्वतःची कार्ड डाऊनलोड करून घेऊ शकता किंवा csc सेंटर जाऊन डाउनलोड करू शकता.

 

  • वरील प्रमाणे दिलेली सर्व माहिती सांगितल्याप्रमाणे हे कार्ड तयार होण्यासाठी आपल्याला 30 रुपये मोजावे लागत होते परंतु आयुष्यमान गोल्डन कार्ड आता फ्री मध्ये बनवता येईल.

 

कोण कोणते कागदपत्र लागतात आयुष्यमान गोल्डन कार्ड काढण्यासाठी

यासाठी आपल्याला सर्वप्रथम ओळखपत्र मध्ये आधार कार्ड, शिधापत्रिका, पासपोर्ट साईज फोटो व रजिस्टर केलेला मोबाईल नंबर इत्यादी प्रमाणात कागदपत्रे लागतील.

पात्रता काय असणार आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड साठी

आरोग्य यादीमध्ये जर तुमचे नाव आले असेल तर तुम्हाला गोल्डन कार्ड देण्यात येईल तसेच अर्थ अर्जदार हा भारतीय नागरिकत्वाचा असणे आवश्यक आहे. आणि दरिद्र्यरेषे खालील BPL कार्डधारक राहावे लागणार याशिवाय कुटुंबांमधील कोणत्याही सदस्य च्या नावावर पक्के घर बांधलेले नसावे. जनगणनाच्या डेटा मध्ये अर्जदाराचे नाव उपलब्ध असले पाहिजे.

आयुष्यमान भारत कार्ड चे फायदे

PMGAY अंतर्गत गोल्डन कार्ड चे फायदे खालील प्रमाणे आहेत.

* या योजनेमध्ये आपल्या संपूर्ण कुटुंबातील व्यक्ती समाविष्ट होऊ शकतात.
* समाजामधील गरीब वर्गातील व्यक्तींना या गोल्डन कार्ड आरोग्य विमा ची सोय प्रदान करते.
* योजनेचा लाभ संपूर्ण देशामधील लाभार्थी ह्या कोणत्याही सरकारी किंवा खाजगी दवाखान्यात अगदी फ्री मध्ये उपचार करू शकतात.
* हे कार्ड कोविड पेशंटही याचा वापर करू शकता.
* प्रायव्हेट हॉस्पिटल मध्ये सुविधा असल्यास कॅशलेस मध्ये उपचार घेऊ शकता.
* लाभार्थ्यांना या योजनेमध्ये 5 लाख रुपये पर्यंत फ्री मध्ये उपचार घेता येईल.
* आयुष्यमान गोल्डन कार्ड तुम्हाला 15 दिवसाच्या आत मिळते.

कोण कोणत्या रोगांवर आयुष्यमान भारत कार्ड योजनेचे फायदे घेता येईल.
1300 विविध अशा रोगांवर योजनेअंतर्गत उपचार करता येईल. कॅन्सर ,हृदयरोग ,मधुमेह ,किडनी रोग ,इत्यादी विविध रोगांवर उपचार करता येणार.

आयुष्यमान गोल्डन कार्ड काढल्यानंतर किती रुपयांपर्यंत फ्री मध्ये उपचार करू शकतात.
तुम्हा 5 लाख रुपयापर्यंत फ्री मध्ये गोल्डन कार्ड बनवल्यानंतर उपचार करता येईल.

आयुष्यमान गोल्डन कार्ड हरवले असल्यास काय करावे लागणार.
जर कुठे हरवले असल्यास तुम्हाला गोल्डन कार्ड चे डुप्लिकेट कार्ड बनवायचे असेल किंवा त्यांची प्रत काढायची असल्यास तुम्हाला पंधरा रुपये देऊन तुमच्या बायोमेट्रिक्स ऑथेंटिकेट करावे लागेल त्यानंतर तुम्हाला नवीन कार्ड देण्यात येईल.

अशाप्रकारे आज आपण आयुष्यमान भारत गोल्डन कार्ड कसे बनवायचे याबद्दल माहिती जाणून घेतले असेल तर मित्रांनो तुम्हाला हे लेख आवडल्यास तुम्ही तुमच्या जवळील मित्रांनो शेअर करू शकता धन्यवाद.

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇

Leave a Comment