सार्वजनिक बांधकाम विभाग अंतर्गत 2109 पदांची भरती !12 वि पास व पदवीधरांसाठी सुवर्ण संधी..

Maharashtra PWD Bharti 2023 : महाराष्ट्र शासनाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभागातील खालील १४ संवर्गातील एकूण २१०९ पदांचे सरळसेवा भरती करीता मुख्य अभियंता, सा.बां. प्रादेशिक विभाग, मुंबई कार्यालयामार्फत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले आहेत . या भरतीअंतर्गत शिपाई, लघुलेखक, प्रयोगशाळा सहायक, वाहन चालक, वरिष्ठ लिपिक आणि इत्यादी पदांसाठी भरती केली जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग मधील रिक्त पदांच्या जागा भरण्यासाठी नवीन जाहीर केली आहेत . तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता 12वी व पदवीधर उत्तीर्ण असलेले उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या सरकारी विभागांत नोकरी मिळविण्याची ही चांगली संधी आहे. या भरतीसाठीची संपुर्ण माहिती व ऑनलाईन अर्ज लिंक खाली दिली आहेत .

परीक्षा दिनांक :-

याबाबतची माहिती http://mahapwd.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात येईल. तसेच उमेदवारांच्या प्रवेशपत्राद्वारे कळविण्यात येईल.
प्रस्तुत जाहिरातीमध्ये विहित केलेल्या अटी व शर्तींची पुर्तता करणाऱ्या उमेदवारांकडून शासनाच्या ऑनलाईन प्रणालीद्वारे अर्ज मागविण्यात येत आहेत.

जाहिरातीची माहिती http://mahapwd.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी = CLICK HERE

पदसंख्या व आरक्षणासंदर्भात सर्वसाधारण तरतुदी :-

पदसंख्या व आरक्षणामध्ये शासनाच्या संबंधित विभागांच्या सुचनेनुसार बदल (कमी/वाढ) होण्याची शक्यता आहे. पदसंख्या व आरक्षणामध्ये बदल झाल्यास याबाबतची घोषणा/सूचना वेळोवेळी सा.बां. विभागाच्या http://mahapwd.gov.in या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल. संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आलेल्या घोषणा/सूचनांच्या आधारे प्रस्तृत परीक्षेमधून भरावयाच्या पदाकरीता भरती प्रक्रिया राबविण्यात येईल.

Pwd bharti 2023 maharashtra pdf

महिलांसाठी आरक्षित पदांकरीता दावा करणाऱ्या उमेदवारांनी महिला आरक्षणाचा लाभ घ्यावयाचा असल्यास त्यांनी अर्जामध्ये न चुकता महाराष्ट्राचे अधिवासी (Domiciled) असल्याबाबत प्रमाणपत्र सादर करावे. तसेच शासन महिला व बालविकास विभाग निर्णय क्र. महिआ-२०२३/प्र.क्र.१२३/कार्या-२, दिनांक ४ मे २०२३ अन्वये खुल्या गटातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीकरीता नॉन क्रिमिलेअर प्रमाणपत्राची अट रद्द करणेत आलेली आहे.. तसेच, अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती वगळता अन्य मागास प्रवर्गातील महिलांकरिता आरक्षित असलेल्या पदावरील निवडीसाठी दावा करु इच्छिणाऱ्या महिलांना त्या-त्या मागास प्रवर्गासाठी इतर मागासवर्ग व बहुजन कल्याण विभाग तसेच सामान्य प्रशासन विभागाकडून वेळोवेळी विहित करण्यात आल्याप्रमाणे नॉन-क्रिमिलेअर प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे.

विमुक्त जाती (अ), भटक्या जमाती (ब), भटक्या जमाती (क) व भटक्या जमाती (ड) प्रवर्गासाठी आरक्षित असलेली पदे आंतरपरिवर्तनीय असून आरक्षित पदासाठी संबंधित प्रवर्गातील योग्य व पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास अद्ययावत शासन धोरणाप्रमाणे उपलब्ध प्रवर्गातील उमेदवाराचा विचार गुणवत्तेच्या आधारावर करण्यात येईल

एखादी जात/ जमात राज्य शासनाकडून आरक्षणासाठी पात्र असल्याचे घोषित केली असल्यास तसेच सक्षम प्राधिकाऱ्याने प्रदान केलेले जात प्रमाणपत्र (Cast Certificate) उमेदवाराकडे अर्ज करतानाच उपलब्ध असले तर संबंधित जात/जमातीचे उमेदवार आरक्षणाच्या दाव्यासाठी पात्र असतील.

pwd maharashtra recruitment 2023

समांतर आरक्षाबाबत शासन सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक एसआरव्ही-१०१२/प्र.क्र.१६/१२/१६-अ दिनांक १३ ऑगस्ट २०१४ तसेच शासन सामान्य प्रशासन विभाग शुध्दीपत्रक क्रमांक संकीर्ण-२१११८/प्र.क्र.३९/३६-अ दिनांक १९ डिसेंबर २०१८ आणि तद्नंतर शासनाने यासंदर्भात वेळोवेळी निर्गमित केलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यात येईल.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील (ईडब्लूएस) उमेदवारांकरीता शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्रमांक राआधी- ४०१९/प्र.क्र.३१/१६-अ दिनांक १२ फेब्रुवारी २०१९ व समक्रमांकाचे शासन निर्णय दिनांक ३१ मे २०२१ अन्वये विहित -करण्यात आलेले प्रमाणपत्र पडताळणीच्या वेळी सादर करणे आवश्यक राहील.

शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग परिपत्रक क्रमांक सीबीसी-२०१२/प्र.क्र.१८२/विजाभज-१ दिनांक २५ मार्च २०२३ अन्वये विहित कार्यपध्दतीनुसार तसेच शासन शुध्दीपत्रक संबंधित जाहिरातीमध्ये नमूद अर्ज स्विकारण्याचा अंतिम दिनांक संबंधित उमेदवार उन्नत आणि प्रगत व्यक्ती /गटामध्ये (क्रिमीलेअर) मोडत नसल्याबाबतची पडताळणी करण्यासाठी गृहित धरण्यात येईल.

शासन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग परिपत्रक क्रमांक सीबीसी-२०१३/प्र.क्र.१८२/विजाभज-१ दिनांक १७ ऑगस्ट २०१३ अन्वये जारी करण्यात आलेल्या आदेशानुसार उन्नत आणि प्रगत व्यक्ती / गटामध्ये मोडत नसल्याचे नॉन -क्रिमीलेअर प्रमाणपत्राच्या वैधतेचा कालावधी विचारात घेण्यात येईल.

pwd recruitment 2023 apply online

सेवा प्रवेशाच्या प्रयोजनासाठी शासनाने मागास म्हणून मान्यता दिलेल्या समाजाच्या वयोमर्यादेतमध्ये सवलत घेतलेल्या उमेदवारांचा अराखीव (खुला) पदावरील निवडीकरीता विचार करणेबाबत शासनाच्या धोरणानुसार कार्यवाही करण्यात येईल.

अराखीव (खुला) उमेदवारांकरीता विहित केलेल्या वयोमर्यादा तसेच इतर पात्रता विषयक निकषासंदर्भातील अटींची पुर्तता करणाऱ्या सर्व उमेदवारांचा (मागासवर्गीय उमेदवारांसह) अराखीव (खुला) सर्वसाधारण पदावरील शिफारशीकरीता विचार होत असल्याने, सर्व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांनी त्यांच्या प्रवर्गासाठी पद आरक्षित/उपलब्ध नसले तरी. अर्जामध्ये त्यांच्या मुळ प्रवर्गासंदर्भातील माहिती अचूकपणे नमूद करणे बंधनकारक आहे.

कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा लाभ हा केवळ महाराष्ट्राचे सर्वसाधारण रहिवासी असणाऱ्या उमेदवारांना अनुज्ञेय आहे. सर्वसाधारण रहिवासी या संज्ञेला भारतीय लोकप्रतिनिधित्व कायदा १९५० च्या कलम २० अनुसार जो अर्थ आहे तोच अर्थ असेल.

कोणत्याही प्रकारच्या आरक्षणाचा (सामाजिक अथवा समांतर) अथवा सोयी सवलतींचा दावा करणाऱ्या उमेदवारांकडे संबंधित कायदा/नियम/आदेशानुसार विहित नमुन्यातील प्रस्तुत जाहिरातीस अनुसरुन अर्ज स्विकारण्यासाठी विहित केलेल्या दिनांकापूर्वीचे वैध प्रमाणपत्र उपलब्ध असणे अनिवार्य आहे.

हे पण वाचा :  SSC GD constable recruitment 2023 : तब्बल 26,146 हजार पदांची 10 वी पास उमेदवार साठी ssc gd constable भरती अधिसूचना जाहीर. ऑनलाईन अर्ज लिंक व सविस्तर माहिती येथे पाहा.

पदाच्या निवडीसाठी कार्यपध्दती, आवश्यक कागदपत्रे तसेच महत्वाच्या अटी व शर्ती (सर्व उमेदवारांसाठी) :- ५.१ संवर्ग क्र. १ ते १४ या सर्व पदांसाठी अर्ज केलेला उमेदवार हा महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा व त्यांचेकडे महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.

संवर्ग क्र. १ ते १४ या सर्व पदांसाठी अर्ज केलेल्या उमेदवारांसाठी शासन महसूल व वन विभाग निर्णय क्र. रिपम/प्र.क्र.६६/२०११/ई-१० दिनांक २७ जून २०११ नुसार ज्या उमेदवाराकडे अधिवास प्रमाणत्र (Domicile Certificate) उपलब्ध नसल्यास त्यांनी त्यांचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला असल्याचा जन्म दाखला (Birth Certificate) सादर करणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. सदर उमेदवाराकडे अधिवास प्रमाणपत्र तसेच जन्म तारखेचा दाखला उपलब्ध नसल्यास, त्या उमेदवाराने आपला शाळा सोडल्याचा दाखला सादर करणे आवश्यक राहील. परंतू सदर शाळा सोडल्याच्या दाखल्यामध्ये त्या उमेदवाराचा जन्म हा महाराष्ट्र राज्यात झाल्याची नोंद असणे आवश्यक आहे. अशा प्रकरणात अधिवास प्रमाणपत्राची अट लागू राहणार नाही. ज्या उमेदवाराचा जन्म महाराष्ट्र राज्यात झाला नसेल परंतू महाराष्ट्र राज्यातील रहिवास सलग १५ वर्षे व त्यापेक्षा अधिक कालावधीचा आहे अशा उमेदवारांसाठी अधिवास प्रमाणपत्र (Domicile Certificate) आवश्यक राहील.

उमेदवाराने अर्ज केला अथवा विहित अहंता धारण केली म्हणजे परीक्षेला बोलविण्याचा अथवा नियुक्तीचा हक्क प्राप्त झाला असे नाही. आरक्षित मागास प्रवर्गाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना ज्या संदर्भातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जात प्रमाणपत्र (Cast Certificate) व उपलब्ध असल्यास जात वैधता प्रमाणपत्र (Validity Certificate) निवडीअंती सादर करणे आवश्यक आहे.

जात वैधता प्रमाणपत्र उपलब्ध नसल्यास, शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्रमांक बोसोसी- २०११/प्र.क्र.१०६४/२०११/१६-ब दिनांक १२ डिसेंबर २०११ मधील तरतूदीनुसार, याचिका क्र. २१३६/२०११ व अन्य याचिकांवर मा.मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दि. २५.८.२०११ रोजी दिलेल्या आदेशाच्या विरोधात मा. सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली येथे दाखल केलेल्या एसएलपी मधील आदेशाच्या अधीन राहून तात्पुरते नियुक्ती आदेश निर्गमित केल्याच्या दिनांकापासून ०६ महिन्याचे आत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे, अन्यथा त्यांची नियुक्ती पूर्वलक्षी प्रभावाने रद्द करण्यात येईल.

उमेदवारांनी परीक्षेसाठी स्वखर्चाने उपस्थित रहावे लागेल. परिक्षेसाठी नेमून दिलेल्या परिक्षा केंद्रावर दिलेल्या वेळेपूर्वी १ तास ३० मिनिटे (९० मिनिटे) अगोदर उपस्थित रहावे.

Pwd bharti 2023 maharashtra date

नियुक्ती होणाऱ्या उमेदवारास शासन वित्त विभाग निर्णय क्रमांक अंनियो १००५/१२६/सेवा-४ दिनांक ३१ ऑक्टोंबर २००५ नुसार लागू करण्यात आलेली नवीन परिभाषित अंशदायी निवृत्तीवेतन योजना (New Defined Contributory Pension Scheme) लागू राहील. त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा (निवृत्तीवेतनाचे अंशराशीकरण) नियम १९८४ आणि सर्वसाधारण भविष्य निर्वाहनिधी योजना लागू राहणार नाही. तथापि, सदर नियमात भविष्यात काही बदल झाल्यास त्याप्रमाणे योजना लागू राहील.

अंतिम निवड यादीतील पात्र उमेदवारांनी सादर केलेल्या विविध प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मूळ प्रमाणपत्राचे आधारे कागदपत्रे तपासणीवेळी तपासण्यात येतील. सदर प्रमाणपत्राच्या साक्षांकित प्रती मूळ प्रमाणपत्राच्या आधारे कागदपत्र तपासण्याच्या वेळी उपलब्ध करुन देणे उमेदवारांना बंधनकारक राहील. त्यामधील प्रमाणपत्रे खोटी किंवा चुकीची आढळल्यास संबंधीत उमेदवारास अपात्र ठरवण्यात येईल.

परीक्षेचे स्वरुप :-

  • परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येईल. परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपाच्या असतील. प्रश्नपत्रिकेतील प्रत्येक प्रश्नास अधिकाधिक ०२ गुण ठेवण्यात येतील. शासन, सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ दिनांक ४ मे २०२२ मधील
  • तरतूदीनुसार संवर्ग क्र. १ ते १४ या सर्व पदांकरीता मौखिक (मुलाखती) परीक्षा घेण्यात येणार नाहीत…. १७.१५.३ उमेदवारांची निवडसूची तयार करणेसाठी शासन सामान्य प्रशासन विभाग परिपत्रक क्रमांक एसआरव्ही- १०९७/प्र.क्र.३१/९८/१६-अ दिनांक १६ मार्च १९९९ आणि शासन सामान्य प्रशासन विभाग शुध्दीपत्रक क्रमांक संकीर्ण-२११९/प्र.क्र.३९/१६-अ दिनांक १९ डिसेंबर २०१८ तसेच शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ दिनांक ४ मे २०२२ नुसार कार्यवाही करण्यात येईल.
  • शासन, सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/प्र.क्र.५४/का.१३-अ दिनांक ४ मे २०२२ मधील तरतूदीनुसार गुणवत्ता यादीमध्ये अंतर्भाव करण्यासाठी उमेदवारांनी एकूण गुणांच्या किमान ४५ टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • परीक्षेचा निकाल (निवडसूची) तयार करतांना परीक्षेत ज्या उमेदवारांना समान गुण असतील अशा उमेदवारांचा प्राधान्यक्रम हा महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभाग निर्णय क्रमांक प्रानिमं-१२२२/ प्र.क्र.५४/का.१३-अ दिनांक ४ मे २०२२ मध्ये नमूद निकषांच्या आधारे क्रमवार लावला जाईल.
  • प्रश्नपत्रिकेतील प्रश्नाबाबत उमेदवारास काही हरकत असल्यास प्रति प्रश्न रुपये १००/- इतके शुल्क आकारले जाईल. तसेच परीक्षेच्या समाप्ती दिनांकापासून सात (०७) दिवसाच्या आत प्राप्त असलेल्या हरकती विचारात घेण्यात येईल.
  • परीक्षा ही ऑनलाईन (Computer Based Test) पध्दतीने घेण्यात येणार असून प्रत्येक सत्राच्या प्रश्नपत्रिका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असून एकापेक्षा जास्त सत्रात परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. सत्र १ ते अंतिम सत्र यामधील प्रश्नपत्रिकेचे स्वरुप व त्याची काठिण्यता तपासण्यात येऊन त्याचे समानीकरण करणेचे (Normalization) पध्दतीने गुणांक निश्चित करुन निकाल जाहीर करणेत येईल. Normalization साठीचे सूत्र संकेतस्थळावर माहितीसाठी प्रकाशित केलेले आहे. सदर (Normalization) सर्व परिक्षार्थी यांना बंधनकारक राहीला, याची सर्व परिक्षांनी नोंद घ्यावी.
👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇