लाडक्या बहिणींसाठी सरकारचं खास गिफ्ट: रक्षाबंधनाच्या दिवशी महिलांच्या खात्यात जमा होणार 3000 रुपये!

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना 2024 : च्या लाभार्थी महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. या योजनेचा शुभारंभ रक्षाबंधनाच्या दिवशी होणार असून त्या दिवशी महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे एकत्रित हप्ते जमा करण्यात येणार आहेत. त्यामुळे राज्यातील महिलांच्या खात्यात एकूण 3000 रुपये जमा होतील. 19 ऑगस्ट रोजी ज्या महिलांच्या कागदपत्रात काहीच अडचण नाही अशा सर्व महिलांना 3000 रुपये देण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. या योजनेचा लाभ राज्यातील दीड कोटी महिलांना होणार आहे.

महिला लाभार्थ्यांसाठी विशेष गिफ्ट

रक्षाबंधनाच्या दिवशी राज्य सरकारकडून महिलांसाठी खास गिफ्ट देण्यात येणार आहे. ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ योजनेचा शुभारंभ रक्षाबंधनाच्या दिवशी होणार असून त्या दिवशी महिलांच्या खात्यात दोन महिन्यांचे हप्ते जमा केले जातील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना 3000 रुपये खात्यात वर्ग करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी पात्रतेचे निकष

महाराष्ट्रातील रहिवासी महिला
विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्त्या आणि निराधार महिला


कागदपत्रांची आवश्यकता

  • आधार कार्ड
  • रेशनकार्ड
  • उत्पन्नाचा दाखला
  • रहिवासी दाखला
  • बँक पासबुक
  • अर्जदाराचा फोटो
  • अधिवासाचं प्रमाणपत्र किंवा जन्म प्रमाणपत्र
  • लग्नाचे प्रमाणपत्र
  • अर्ज प्रक्रिया

योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाइल अॅप किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन भरता येतात. ज्यां महिलांना लाडकी योजनेसाठी अर्ज करता येत नाही त्यांना अंगणवाडी केंद्रात सुविधा मिळेल.

मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झालेल्या नवीन नियम आणि अटी

लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्ट ऑफिस चे बँक खाते ग्राह्य धरले जाणार आहे.
परराज्यात जन्म झालेल्या आणि महाराष्ट्रात विवाह केलेल्या महिलांना पतीच्या कागदपत्रांवर योजनेचा लाभ मिळणार आहे.
ग्रामस्तरीय समितीमार्फत प्रत्येक शनिवारी लाभार्थी महिलांची यादी वाचन करून दाखवावी लागेल.
केंद्र सरकारची योजना घेत असलेल्या महिलेला लाभार्थी म्हणून ग्राह्य धरावे, मात्र तिच्याकडून ऑफलाईन अर्ज भरून घ्यावा.
नव विवाहित महिलेसाठी विवाह नोंदणी लगेच शक्य नसल्यास पतीचे रेशनिंग कार्ड पुरावा म्हणून ग्राह्य धरावे.
ओटीपी चा कालावधी दहा मिनिटांचा करण्यात यावा.

हे पण वाचा :  आयोध्या राम मंदिराचा 2100 किलो वजनाचा घंटा: भगवान रामाच्या दरबारासाठी तयार, किंमत आणि वैशिष्ट्य जाणून घ्या


या योजनेमुळे महिलांना आर्थिक सहाय्य मिळून त्यांच्या सन्मानात वाढ होईल. रक्षाबंधनाच्या दिवशी मिळणाऱ्या या विशेष गिफ्टमुळे महिलांच्या आनंदात भर पडेल.

👇👇माहिती आवडली असेल तर याद्वारे इतरांना पाठवा.👇👇